mh 13 news network
सोलापूर जिल्हा मे.न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नूतनकरणाचे सेवक जितेंद्र चंदले यांच्या हस्ते उद्घाटन …
जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी घडविले माणुसकीचे दर्शन…
शनिवारी सोलापूर जिल्हा मे. न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील कार्यालयाच्या नुतनीकरणाचे उद्घाटन जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील सेवक जितेंद्र चंदले व जेष्ठ जिल्हा सरकारी वकीलांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. शासनाच्या विविध
कामकाजासाठी सोलापूर जिल्हा न्यायालयात स्वतंत्र कक्ष आहे . या कक्षाचे संपूर्ण कामकाज जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदिपसिंग राजपूत यांच्या आदेशान्वये चालते. जिल्हा सरकारी वकील ॲड.प्रदीपसिंग राजपूत यांच्या यांच्या संकल्पनेतून सरकारी वकील या स्वतंत्र कक्ष विभागात आकर्षक असे विशेष डिझाईन साकारण्यात आले आहे. शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आलेल्या सरकारी वकिलांमार्फत खटल्यांचे कामकाज वेगवान पद्धतीने चालते.

या उद्घाटनपर कार्यक्रमा प्रसंगी जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत
सहायक सरकारी वकील ॲड.गंगाधर रामपुरे ॲड.प्रकाश जन्नू, ॲड .शैलजा क्यातम, ॲड .प्रकाश जन्नू, ॲड.रजनी बुजरे, ॲड.आनंद कुर्डुकर, ॲड .कविता बागल, ॲड .शीतल डोके, ॲड .दत्तू सिंग पवार ,ऑफीस कर्मचारी भगवान कदम, रोहित माने, बिराजदार, वांडरे, साखरे , यांची उपस्थिती होती…