MH 13 NEWS NETWORK
स्वीप समिती आणि मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालय यांचा उपक्रम
सोलापूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकसाठी भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार मतदान जनजागृती, तसेच मतदारांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता क्लबच्या विद्यार्थ्यानी अक्कलकोट शहरातील बस स्थानकासमोरील मुख्य चौकात मतदान का आवश्यक आहे, सुयोग्य उमेदवार कसा निवडावा याबाबी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांसमोर मांडल्या. यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
.
यावेळी स्वीप नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोम्पे, गट विकास अधिकारी श्री शंकर कवितके, पोलीस निरीक्षक श्री स्वामी, परिविक्षाधिन तहसीलदार श्रीकांत कांबळे, स्वीप समितीचे सदस्य श्री जयंत भोसले, निवडणूक साक्षरता मंडळ सोलापूर जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार, श्री परमशेट्टी आणि राजेश पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.