MH 13 NEWS NETWORK
सोलापूर /प्रतिनिधी
शहरातील नई जिंदगी परिसरातील एका चिमुकल्याचा डंपरच्या खाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी घडली आहे.
नई जिंदगी नागनाथ नगर येथे डंपरच्या खाली येऊन एका आठ वर्षे चिमुकल्याच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.असद गौस शेख वय वर्षे 8 असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
असद हा हैद्राबाद येथे राहण्यास असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे सोलापुरातील आजीजवळ आला होता.
आपल्या मामासोबत घरकुल येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला.
डंपर चालक पळून गेला असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेली आहे. पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.