MH 13News Network
स्वातंत्र्य,समता,बंधुता या मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी
मोहोळ तालुक्यातील जामगाव खुर्द येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने संविधान पुस्तिकेच्या प्रती वाटप करण्यात आले.
संविधानाविषयी जनजागृती निर्माण होऊन स्वातंत्र्य,समता, बंधुता या मूल्यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने भीम क्रांती तरुण मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून परमेश्वर आश्रम शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक उत्तम थोरात तर अध्यक्ष म्हणून गावच्या सरपंच पपीता फडतरे उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख उपस्थिती पत्रकार श्रीनिवास तिर्थे, संदेश क्षीरसागर,गंगाधर हाके, सज्जन कांबळे,सुनील गायकवाड, आमिर अली शेख आदींची होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले तर आभार गावचे पोलीस पाटील दत्तात्रय फडतरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष बनसिद्ध कांबळे,उपाध्यक्ष रमेश फडतरे,सचिव तुळशीराम उबाळे, नितीन फडतरे,देविदास फडतरे, अमोगसिद्ध कांबळे,अमोगसिद्ध फडतरे,बाळासाहेब फडतरे,अमर फडतरे,नितीन फडतरे,नितीन हरिदास फडतरे,भारत फडतरे, अनिल फडतरे,संतोष उबाळे,चेतन फडतरे आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.