MH 13News Network
रामनवमीच्या पूर्वसंध्येला जनकल्याणार्थ १५१ हवन कुंडीय यज्ञ
अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संगम व श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दाजी पेठ येथील डॉ. हेगडेवार पटांगण येथे रामनवमीच्या पूर्वसंध्येला श्रीराम जनकल्याण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी १५१ हवन कुंडीय कार्यक्रम संपन्न झाले. हा सोहळा गेल्या ४० वर्षापासून मौन व्रत असलेले तपस्वी गुरुवर्य श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे मुख्य पुजारी व संत चोळाप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराज यांच्या दिव्य सानिध्यात पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या पुरोहित्यात हा सोहळा संपन्न झाला. प्रारंभी यावेळी अयोध्या येथील श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतीरुप असणाऱ्या मूर्तीची यावेळी विधीवत पूजन होऊन या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी भाजपाचे उमेदवार राम सातपुते, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कारंजे, माजी महापौर महेश कोठे,शिवव्याख्याते शिवरत्न शेट्टे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, श्रीराम जन्मोत्सव समितीचे सदस्य संजय साळुंखे, श्रीराम जन्मोत्सव समितीचे संस्थापक सदस्य अक्षय अंजीखाने,यतिराज होनमाने, संजय होमकर, श्रीनिवास संगा,अमर बिराजदार, सुधीर बहिरवाडे चन्नवीर चिट्टे, सोमनाथ केंगनाळकर,संदीप महाले यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांच्या पौरोहित्याखाली १५१ हवनकुंडीय यज्ञ कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो अनेक अभ्यासांमध्ये हे स्पष्ट झाले आहे हवन केल्याने प्रदूषण मुक्त वातावरण मिळते. बहुतेक आणि आध्यात्मिक समृद्धीसाठी आशीर्वाद हवन हे आरोग्य संपत्ती आणि आध्यात्मिक वाढीसह जीवनाच्या विविध पैलूंसाठी आशीर्वाद मिळण्यासाठी विशिष्ट हेतूने केले जाते विधी या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करते असे मानले जाते यज्ञ म्हणजे अग्नीत तूप टाकणे आणि मंत्र पठण करणे असा नाही व्यक्ती प्रमाणेच समाजाचे कल्याणहाही हेतू धरून याग आणि होम हवन केले जाते हवन केल्याने सकारात्मक शक्तीचा निर्माण होतो असे या कार्यक्रमाचे महत्त्व यावेळी पंडीत वेणुगोपाल जिल्हा पंतलू यांनी सांगितले. यावेळी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. लोककल्याणार्थ श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केल्यानिमित्त आमदार राम सातपुते यांनी समितीचे कौतुक करत यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जय श्रीरामचा नारा त्यांनी दिला. या कार्यक्रमास देविदास कुरापाटी पंतलू, संतोष चंना पंतलू, नागराज रासकोंडा पंतलु, देविदास यंगलदास पंतलू, महादेव तुम्मा, व्यंकटेश जिल्हा पंतलू, सतीश पारेली,प्रथमेश बोमेन, मुरली गुडेली, सिद्धू कुंभार, अनिल वंगारी यांचे विशेष सहकार्य लाभले.होमवन कार्यक्रमानंतर रामनवमीच्या पूर्वसंध्येला दाजी पेठ परिसरात श्री रामनवमीनिमित्त रथ मिरवणूक हलगीच्या निनादात मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात काढण्यात आला जय श्रीराम जय जय श्रीराम चा नारा यावेळी उपस्थित रामभक्तांनी दिला यामुळे अवघा परिसर राममय झाला होता. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री राम जन्मोत्सव समितीचे सदस्य तसेच अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघमचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले
.