\MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : होटगी येथील टिकेकर वाडी येथे सांय काळी ४ च्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या वादळामुळे जुने झाडे उन्मळून पडली असून
गावातील घरावरील पत्रे उडून गेली आहेत तर काही घरांवर झाड पडल्याने घरांची पडझड झाली आहे.तर विजेचे खांब व तारा तुटून पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे.ऐन उन्हाच्या गर्मीत पावसाच्या थंडाव्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात असले तरी टिकेकर वाडी येथील नागरिकांना मोठा फटका बसला असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.तासभर पडलेल्या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.
या नुकसानीमुळे ग्रामस्थांनी तहसीलदार व तलाठी यांना संपर्क साधला होता. अद्याप गावात कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती.
गंगू निखिल सकट, दत्तूसिंग राजपूत, ललिता लोंढे, भोराम्मा अर्जुन बिराजदार,रमजान शेख, शगेरा शेख, बानू शेख आदी गावाकऱ्यांचे नुकसान झाले आहे.