सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा शहर जिल्हा सोलापूर वतीने मुंबई दौऱ्या संदर्भात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला 50% मधून सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मुंबई येथे आझाद मैदान वर दिनांक 20 जानेवारी 2024 पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. तरी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला साथ घालण्यासाठी व मुंबई दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी सदरची बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता गोविंद श्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या बैठकीस तमाम मराठा समाजातील बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.