वाई, दि. ४ : भारतीय जनता पक्ष सातारा जिल्हा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील प्रसिध्द व्यापारी मिलिंद खामकर यांची नुकतीच निवड झाली करण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी मिलिंद खामकर यांच्या सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेऊन व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. यापूर्वी मिलिंद खामकर यांनी सातारा जिल्हा डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तम काम केलेले आहे. तसेच वाई तालुका डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे ते अध्यक्ष होते.
यावेळी मिलींद खामकर यांना जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी भा ज पा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेठवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन साळुंखे, शहराध्यक्ष विकास गोसावी, शहर उपाध्यक्ष प्रशांत जोशी, रवी लाहोटी उपस्थित होते.
त्यांच्या निवडीबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंह राजे भोसले,श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, वाईचे मा. आमदार मदन दादा भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर तसेच वाई तालुका अध्यक्ष दीपक ननावरे, उपजिल्हाध्यक्ष अजय मांढरे, रोहिदास पिसाळ, वाई शहराध्यक्ष विजय ढेकाणे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. जिल्ह्यातील विविध वर्गातर्फे विशेषतः व्यापारी वर्गातर्फे मिलिंद खामकर यांचे निवडीबद्दल समाधान व्यक्त केले गेले.